नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी ३० हजार रुपयाची लाच घेतांना मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा. आबिद आबू अतार व वैद्यकिय अधिकारी डॅा. प्रशांत एकनाथ खैरनार हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे. तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे. अशा कैदांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैदांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा. आबिद आबू अतार व वैद्यकिय अधिकारी डॅा. प्रशांत एकनाथ खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पंचासमक्ष तडजोड अंती ३० हजार रुपयाची लाच स्विकारली. या दोघां डॅाक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय- ३५ वर्ष.
*आलोसे- १)डॉ. आबिद आबू अत्तार वय ४० वर्षे वर्ग- १ पद – मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड
२)डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार वय ४२ वर्षे वर्ग -२ पद- वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. इंदिरानगर, नाशिक
*लाचेची मागणी- ४०,००० /- तडजोडअंती ३०,०००/- रुपये
*लाच स्विकारली- ३०,०००/-
*हस्तगत रक्कम- ३०,०००/-
*लालेची मागणी – दि. १४/०७/२०२४
*लाच स्विकारली – दि.१४/०७/२०२४
तक्रार:- यातील तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे अशा कैदांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते, परंतु अशा कैदांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. म्हणून आलोसे क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे सुरुवातीला ४०,०००/- रुपयांची मागणी करून पंचासमक्ष तडजोड अंती ३०,०००/- रुपयाची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक १४/०७/२०२४ रोजी पंच साक्षीदारा समक्ष स्विकारले आहे. म्हणून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून, आलोसे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी – श्री. स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 9403234142
*सह सापळा अधिकारी – श्री. राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मो.नं. ८२०८९७१२०७
*सापळा पथक*
पोहवा/प्रभाकर गवळी,
पोहवा/ प्रफूल्ल माळी
पोहवा/ संतोष गांगुर्डे
पोना/किरण धुळे