शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ…सोयी सुविधा व कल्याणकारी योजना राबवल्या जाणार

by India Darpan
जुलै 14, 2024 | 9:47 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
varkari

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर महामंडळाचे मुख्यालय ते पंढरपूर येथे असणार आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे, वारकरी जो धर्म पाळतात त्याला धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते ,वारीतून संप्रदायाची सामाजिकता आणि समाज समाजभीमुक्तामुक्ता स्पष्ट होते व त्याचा प्रभाव जन माणसावर पडलेला दिसून येतो ,महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी ,शेतकरी समावेश असतो. परंतु कालारूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक ११ जुलै २०२४ रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीची माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे .तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार ,वारकऱ्यांना अन्न ,सुरक्षा, वैद्यकीय मदत. विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे . पंढरपूर, देहू ,आळंदी ,मुक्ताईनगर ,सासवड ,पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर ,पैठण ,कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर ,भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा ,इंद्रायणी , गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याचेही प्रस्तावित आहे . श्री क्षेत्र पंढरपूर चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्यात येईल. यासह अनेक विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. महिला वारकऱ्यांसाठी देखील स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधनगृहे, वस्त्रांतर अनुषंगिक सोयीसुविधा करण्यात येणार आहे.

आवश्यक निधी दिला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सामाजिक समतेची बंधुभावाची मोठी परंपरा आहे, विविध जातीपातीचे लोक या ठिकाणी हजारो वर्ष पासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, अशा समृद्ध महाराष्ट्रात जाती जातीला एकत्रित ठेवण्याचे काम ज्यांनी केले त्यात महाराष्ट्रातील थोर समाजसेवक विभूती आणि संत महंत मोठा हातभार आहे. त्यात वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार वारकरी यांचे योगदानही बहुमूल्य आहे , त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना व सोयी सुविधा पुरविण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे या महामंडळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अशी आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना..जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next Post

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहाचे दोन डॅाक्टर ३० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहाचे दोन डॅाक्टर ३० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011