इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षे मुले- मुली, १७ वर्षे मुली आणि १९ वर्षे मुले या चार वयोगटाचा समावेश होता. स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी सर्व गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. या स्पर्धेत मुंबई आणि पुणे विभागाच्या संघानी वर्चस्व गाजवत अनुक्रमे दोन दोन गटांचे विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट मिळविला.
१४ वर्षे मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई विभागाचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या माटुंगाच्या डॉन बॉस्को शाळेच्या संघाने संभाजीनगर विभागाच्या बीड जिल्ह्याच्या चंदावती माध्यमिक स्कुलचा ३८- २९ अश्या नऊ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. १४ वर्षे मुलीच्या गटात पुणे विभाग आणि कोल्हापूर विभाग यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरदार दस्तूर नौशेखान गर्ल्स स्कुलच्या खेळाडूंनी प्रथमपासूनच या सामन्यावर पकड जमवत हा सामने ४३ – २८ असा जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले.
१७ वर्षे मुलींच्या गटात पुणे शहरच्या मिलेनियम नॅशनल स्कुलच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून कोल्हापूरच्या वरणगांवच्या तात्यासाहेब कोरे संघावर सहा गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. १९ वर्षे मुलांच्या मुंबई विभागाच्या नवी मुंबईच्या फादर अग्नेल स्कुलच्या संघाने अंतिम प]लढतीत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सातारच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा ५६ – ४९ अश्या सात गुणांनी पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले.
१४ वर्षे मुलांमध्ये कोल्हापूर विभागाच्या सातारच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. तर १४ वर्षे मुलींमध्ये आणि १७ वर्षे मुलींमध्ये मुंबईच्या ऑक्सिलियन कॉन्व्हेंट स्कुलच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. १९ वर्षे मुलांमध्ये संभाजनगर संघाने जिद्देने खेळ करून बलाढ्य पुणे संघावर तीन गुणांनी पराभव करून तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघांना प्रमुख पाहुणे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे अविनाश पाटील आदी मान्यवरांसाभ्य हस्ते आकर्षक चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, स्पर्धा प्रमुख राजेश क्षत्रिय, राज्य प्रतिनिधी शत्रुघ्न गोखले, वासुदेव थेटे, जयंत देशमुख, मुद्रा अग्रवाल, जिल्हा सचिव जकिर सय्यद, क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, संदीप ढाकणे, महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, क्रीडा प्रशिक्षक अरविंद खांडेकर, चित्रा उदार आणि सर्व कार्यकर्ते आदींनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धेचे अंतिम निकाल :
१४वर्षे मुले –
१) मुंबई विभाग, डॉन बॉस्को स्कुल, माटुंगा – विजेतेपद
२) छत्रपती संभाजीनगर विभाग – बीड जिल्हा, चंदावती मध्य. स्कुल, बीड. – उपविजेतेपद
३) कोल्हापूर विभाग – इंग्लिश मिडीयम स्कुल, सातारा – तिसरा क्रमांक
१४ वर्षे मुली –
१) पुणे विभाग, सरदार दस्तूर कौंसेखान गर्ल्सस स्कुल, पुणे शहर – विजेतेपद
२) कोल्हापूर विभाग – इंग्लिश मिडीयम स्कुल, सातारा – उपविजेतेपद
३) मुंबई विभाग – ऑक्सिलियन कॉन्व्हेंट स्कुल, वडाळा, मुंबई – तिसरा क्रमांक
१७ वर्षे मुली –
१) पुणे विभाग, मिलेनियम नॅशनल स्कुल, पुणे शहर – विजेतेपद
२) कोल्हापूर विभाग – तात्यासाहेब कोरे इंग्लिश स्कुल,वारणानगर – उपविजेतेपद
३) मुंबई विभाग – ऑक्सिलियन कॉन्व्हेंट स्कुल, वडाळा, मुंबई – तिसरा क्रमांक
१९ वर्षे मुले – उपांत्य सामने –
१) मुंबई विभाग – फादर अग्नेल स्कुल, वाशी, नवी मुंबई – विजेतेपद
२) कोल्हापूर विभाग – यशवंतराव चव्हाण स्कुल, सातारा – उपविजेतेपद
३) छत्रपती संभाजीनगर विभाग – देवगीरी कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीनगर – तिसरा क्रमांक