इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : ‘टीम इंडिया’चे महान खेळाडू अंशुमन गायकवाड कर्करोगाशी झुंज असून त्यांच्यावरील उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी माजी कर्णधार कपिल देव यांनी ‘बीसीसीआय’सोबत केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी गायकवाड यांना आर्थिक मदत म्हणून तातडीने एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
शाह यांनी अंशुमनच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. शाह यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि मदत करण्याचे आदेश दिले. अंशुमनने भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. भारताचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी दोन वेळा चांगली कामगिरी बजावली. त्याच्यावर वर्षभरापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती कपिल देव यांनी ‘बीसीसीआय’ला केली होती. कपिल देव यांनी त्यांच्या पेन्शनची रक्कम द्यायची तयार दाखवली होती. गायकवाड सध्या ७१ वर्ष आहे. भारताकडून क्रिकेट खेळणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी निधी उभारणीची मोहीम सुरू केली होती.