इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे शासकीय परिपत्रक (GR) आज सरकारने काढले आहे. त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे. यासोबतच इतर राज्यातील , जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.