इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार लढवणार नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आज ते बारामतीत या निर्णयाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. आज बारामती येथे मिशन हायस्कूल मैदान येथे राष्ट्रवादीची ‘जन सन्मान रॅली’ आहे. यावेळेस ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीची तयारी करत आहे. त्यामुळे घरातील संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. पण, ही केवळ चर्चाच आहे की त्यात वेगळं काही दडलेलं आहे. हे या मेळाव्यानंतर स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून सुध्दा लीड घेतला होता. या निवडणुकीत दोन्ही पवार आमने – सामने आल्यामुळे संघर्षही पेटला. हे सर्व टाळण्यासाठी अजित पवार असा निर्णय़ घेण्याची शक्यता आहे.