इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या मुंबई भेटीदरम्यान आज वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात केले तसेच श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते.