इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आम्ही दिलेल्या ९ मागण्या पूर्ण करा अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आजची रात्र तुमच्याकडे शिल्लक आहे. जाहीर नाही केले तर २० तारखेपासून पु्न्हा उपोषण सुरु करु अशी घोषणाही त्यांनी केली. छत्रपती संभाजी नगर येथे जरांगे यांच्या शांतता रॅलीचा १३ जुलै रोजी समारोप झाला. आम्ही आता दुसरा टप्पा नंतर जाहीर करु असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छगन भुजबळांच्या नादी लागू नका. त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पडेल आणि सत्ताही जाईल असेही सांगितले. यावेळी त्यांनी मी उद्या दुपारी रिंगण सोहळ्यासाठी माऊलीच्या दर्शनाला सोलापूरला जाणार असल्याची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले पहिल्या टप्प्याचा हा समारोप आहे. हाच पहिला टप्पा एवढा मोठा झाला आहे. मुंबईत गेल्यावर कसं होईल? शिंदे साहेब, फडणवीस साहेब हे लोक मुंबईला येऊ शकतात. तुमची बंदूक फंदूक काहीच करणार नाही या मराठ्याच्या वादळापुढे असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या हाती आजची रात्र आहे, आमचा अंत पाहू नका असेही सांगितले. यावेळी त्यांनी आम्हाला आज रात्री आरक्षण दिलं नाही तर २० तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. मेलो तरी चालेल. पण मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळणार आहे. २० तारखेला स्थगित केलेलं उपोषण सुरू होणार आहे. २० तारखेला मराठ्यांनी २८८ उमेदवार उभं कारायचे की पाडायचे याची तारीख जाहीर करू असेही त्यांनी जाहीर केले.