सहकार कार्यालयातून सावकारी कारवाईच्या अर्जासह शासकीय कागदपत्र चोरट्यांनी केले लंपास…गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सहकार, पणन व वस्त्रोद्योग कार्यालयात चोरी झाली असून दस्तऐवज चोरीला गेले आहेत. मंगेश वैष्णव यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता १०) मध्यरात्री सदरील चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्याने कार्यालयीन शासकीय दस्तऐवज नेले आहे. यात रजेचे अर्ज, मासिक दैनंदिनी, रोजनामे, पंचनामे, तक्रार अर्ज, अपिल अर्ज, सावकारी कारवाईचे अर्ज, माहिती अधिकार अर्ज आदी स्वरुपाचे शासकीय दस्तांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील राणेनगर ५० हजाराचा ऐवजाची चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात शिरून परिचीत त्रिकुटाने दमदाटी व धक्काबुक्की करीत सिलेंडर टाक्यासह एलईडी टिव्ही बळबरीने काढून नेल्याची घटना सिडकोतील राणेनगर भागात घडली. या घटनेत सुमारे ५० हजाराचा ऐवज लांबविण्यात आला असून संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर जगताप,जगताप यांची पत्नी व अरूणा साळवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत गौतम उत्तमराव थोरात (रा.राणेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आणि तक्रारदार हे एकमेकांचे परिचीत असून,बुधवारी (दि.१०) रात्री ही घटना घडली.
संशयितांनी सुमन पेट्रोल परिसरातील थोरात यांचे घर गाठून रात्रीच्या वेळी दमदाटी व धक्काबुक्की करीत घरातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचे भरलेले आणि रिकामे असे दोन गॅस सिलेंडर तसेच सुमारे ३८ हदार ५०० रूपये किमतीचा एइलईडी टिव्ही बळजबरीने काढून घेत सोबत घेवून गेले. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.