इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने टी -२० सामन्यात झिंबाब्वेवर दणदणीत विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली. आजच्या चौथ्या सामन्यात झिंबाब्वेने भारतीय संघाला विजयासाठी १५३ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच हे आव्हान १५.२ ओव्हरमध्ये पूर्ण केले. या सामन्यात कॅप्टन शुबमन गिल याने ५८ तर यशस्वी जयस्वालने नाबाद ९३ धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाने १० विकेटस राखत झिम्बाब्वेवर सहजपणे विजय मिळवला.
या सामन्यात झिम्बाब्वेने सुरुवात चांगली केली. अर्धशतकी सलामी मिळाली. त्यामुळे मोठी धावसंख्या होईल असे वाटत होते. पण, अभिषेक शर्माने मुरुमानीला बाद केले व भारताला पहिली विकेट मिळाली. त्याने ३ चौकार करुन ३२ धावा केल्या. या विकेटनंतर या संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. भारतीय संघाच्या खलील अहमदने दोन बळी मिळवले तर तुषार देशपांडेने पदार्पणातच एक बळी मिळवला. वॅाशिंग्टन सुंद, अभिषेक शर्मा व शिवम दुबे यांनी एक बळी घेतला.