नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षाने प्रवास करणा-या दोन महिलेचा वेगवेगळ्या घडलेल्या घटनेत पावणे दोन लाखाचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. पहिला घटना दिंडोरी नाका ते शालिमार दरम्यान घडली तर दुसरी घटना नाशिकरो ते कोणार्कनगर या प्रवासादरम्यान
पहिल्या घटनेत रिक्षाप्रवास करणा-या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १२) दुपारी दीड – पावणे दोनच्या सुमारास दिंडोरी नाक्यावरील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून गहाण ठेवलेले सोन्याचे दागदागिने सोडविले आणि ते दागिने व बाराशे रुपयांची रोकड असा ऐवज स्वत:कडील लॅपटॉपच्या सॅकमध्ये ठेवले. त्यानंतर त्या रिक्षाने शालिमारपर्यंत आल्या. त्यावेळी त्यांच्या सॅकची चैन उघडून अज्ञात चोरट्याने दागिने, रोकड असा १ लाख ५१ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत रेल्वेने प्रवास करून नाशिकरोड, आणि तेथून रिक्षाने कोनार्कनगर या प्रवासादरम्यान वयस्कर महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. गयानाबाई पाटील (रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १२) सकाळी त्या पाचोरा (जि. जळगाव) येथून नाशिकरोड रेल्वे एक्सप्रेसने आल्या. त्यानंतर त्या रिक्षातून कोणार्कनगर येथे उतरल्या. या प्रवासा दरम्यान त्यांची पर्स लंपास झाली. पर्समध्ये मोबाईल, सोन्याचे कानातील झुबे व चार हजारांची रोकड असा २५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक उपनिरीक्षक बस्ते हे तपास करीत आहेत.