नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अल्पयवीन पीडितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा परिसरातील गौळाणे रोडवर संशयित सलिम हुसैन शेख (३९, रा. खाटीक गल्ली, पाथर्डी गाव) याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, सदरची घटना शुक्रवारी (ता.१२) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून, पोक्सोसह ॲट्रोसिटी आणि विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकी जखमी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जेलरोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून आलेल्या जितो टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. संजय हरि जाधव (रा. नालंदा सोसायटी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ३० जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सदरचा अपघात झाला. याप्रकरणी जितो टेम्पोचालक (एमएच १५ जीव्ही ९५८१) याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.