इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रायगड जिल्ह्यातील महाड येथील एमआयडीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत चौघांवर उपचार सुरू आहेत. ४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या बेपत्ता कामगारांचा शोध सुरु आहे.
सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ही घटना एमआयडीसीत घडली. पण, तीन-चार तास या स्फोटाची काहीच माहिती मिळत नव्हती. या कंपनीतील स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. त्यामुळे सर्वंत्र घबराट पसरली. स्फोटानंतर वायूगळती झाली. कंपनीतील कामगारांना मुख्यतः वायूगळतीचा त्रास झाला. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अग्नीशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी हजर झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे टँकर घटनास्थळी आले. त्यामुळे आग आटोक्यात आली.
कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यानंतर या आगीत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर चार कामगार बेपत्ता आहे. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती आहे.