नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -कांदा कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भेटीत केली आहे.
२०२१ ते २०२४ या काळादरम्यान महाराष्ट्रामध्ये कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये चढ-उतार झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पाशा पटेल यांनी याच मुद्द्यांवर आकडेवारीनिशी पियुष गोयल यांची भेट घेऊन सर्व प्रश्न मांडले. यावेळी मंत्री गोयल यांना पर्यावरण संतुलित इको फ्रेंडली बांबू पासून निर्मित श्री गणेशाची मूर्ती देखील भेट दिली. शेतकऱ्यांच्या संबंधित शेतमालाचे आयात निर्यात धोरण आणि आयात शुल्क याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तातडीने बैठक करून या विषयांवर ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केले.
आगामी काळात महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सगळ्या शेती प्रश्नांची सोडून करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाणार आहे.
” महाराष्ट्रातील या शेती प्रश्नांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी एक तास बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे, राज्य कृषी मूल्य आयोग आणि टास्क फोर्सचे चे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केले आहे.”