नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जिल्हा परिषद, नाशिक अधिनस्त गट-क चे विविध संवर्गातील पदांचे पदभरती करीता दि.05/08/2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या दरम्यान IBPS संस्थेने घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयास प्राप्त झाला असून सदर निकालाचे अनुषंगाने जलज शर्मा, अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, नाशिक व श्रीमती.आशिमा मित्तल, सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहाय्यक (लेखा) , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य /बांधकाम / ग्रापापु ), वरिष्ठ सहाय्यक (लि), औषध निर्माण अधिकारी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 06 संवर्गाच्या प्रारुप निवड व प्रतिक्षा याद्या दि.13/07/2024 पासून जिल्हा परिषद, नाशिकचे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून पुढील आठवड्यात निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. पशुधन पर्यवेक्षक (पेसा-नॉन पेसा) या संवर्गाच्या प्रारुप निवड यादी प्रसिध्दीचे कामकाज सुरु असून लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येणार आहे.
तसेच यापुर्वी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (ऊ.श्रे.), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या 07 संवर्गात सामाजिक/समांतर आरक्षण व गुणानुक्रमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रारुप निवड यादी व प्रतिक्षा यादीनुसार उमेदवारांचे मुळ कागदपत्रांची तपासणी झाली असून अंतिम निवड व प्रतिक्षा यादी तयार करणेचे कामकाज सुरु आहे. अशी जिल्हा परिषद, नाशिक प्रशासनाचे वतीने रवींद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि), जिल्हा परिषद, नाशिक यांनी माहिती दिली.