मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघआडीचे २ उमेदवार निवडून आले. ११ जागेसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे राहिल्यामुळे या निवडणुकीत चुरस होती. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली तर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांना प्रत्येकी २६ मते पडली. तर सदाभाऊ खोत यांना २३ मते पडली. हे पाचही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे यांना २४ तर राजेश विटेकर २३ मते विजयी झाले. तर शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना २५ तर भावना गवळी यांना २४ मते मिळाली. हे सर्व ९ उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आले.
तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाल्यामुळे पहिल्या फेरीत निवडून आले. तर
शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना २२ मते पडल्यामुळे त्यांना दुस-या फेरीच्या मतमोजणीनंतर त्यांचा आकडा २४ वर गेला. त्यानंतर त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. तर शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार उमेदवार जयंत पाटील (शेकाप) यांना पहिल्या फेरीत फक्त १२ मते पडली. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.