नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागोजी काकोजी कांबळे (रा.घरकुल योजना चुंचाळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांबळे यांनी बुधवारी (दि.१०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरून जमिनीवर उडी घेतली होती. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दुस-या दिवशी दुपारी उपचार सुरू असताना वैद्यकीय सुत्रांनी त्याना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.