मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंत्यत चुरशीच्या अशा विधानपरिषद निवडणुकीत आज सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकमेकांना भेटून हस्तांदोलन करण्याचे चित्र आज दिसत होते. या भेटीत हसत – खेळत गप्पाही या नेत्यांनी मारल्या. पण, या भेटीची राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगली.
विधानभवनात मतदानाच्या वेळी पहिली भेट उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांची झाली. राष्ट्रवादी फुटीनंतर ही भेट सर्वांच्या भुवया उंचवणारी ठरली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी सर्वांसमोरच गप्पा मारल्या. त्यानंतर हे दोन्ही पुढे निघून गेले.
तर दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली. ती सुध्दा चर्चेची ठरली. त्यानंतर संजय राऊत यांची अजित पवार यांची भेट झाली.