इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी माध्यमाशी बोलतांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सुळे यांनी राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते.
या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत. जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न असल्याचेही सुपिया सुळे यांनी म्हटले आहे.