इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणारी त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवली. या प्रकरणात जामीन मंजूर केला असला तरी केजरीवाल हे आता सीबीआय कस्टडीत आहे. त्यामुळे केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहे.
याअगोदर दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला परवानगी दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायलायने दिलासा दिला आहे. पण, केजरीवाल सीबीआय कस्टडीत असल्यामुळे त्यांचे तुरुंगातून बाहेर येणे लांबणार आहे.
याअगोदर २१ दिवसाचा जामीन
याअगोदर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना २१ दिवसाच्या जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा तिहार तुरुंगात सरेंडर केले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केले. त्यानंतर ते पुन्हा २० दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर पुन्हा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. एकुण ७० दिवसाच्या आसपास ते दोन टप्यात तुरुंगात होते.