इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आठ आमदार फुटले असल्याची चर्चा आहे. यातील ४ आमदार अजित पवार गटाकडे तर ४ आमदार हे भाजपला क्रॅास व्होटिंग करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीने ५ जागेवर भाजप, २ शिंदेसेना तर २ जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहे. तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात आहे.
या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार आहे. त्यामुळे २३ च्या कोट्याप्रमाणे २०७ मते लागणार आहे. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांचे बळ आहे. त्यात भाजप १०३, शिंदे सेना ३७, अजित पवार राष्ट्रवादी गट ३९, लहान पक्ष ९, अपक्ष १३ असे आमदार सोबत आहे. तर महाविकास आघाडीकडे ६७ आमदार आहेत. त्यात काँग्रेस ३७, राष्ट्रवादी शरद पवार १३, शिवसेना ठाकरे गट १५ आमदार आहे. त्यात शेकाप १ आणि १ अपक्ष अशी मते आहे. तीन उमेदवारांना २३ मतांप्रमाणे ६९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन मते कमी पडू शकता. त्यात समाजवादीचे दोन आमदारांनी पाठींबा दिला तर महाविकास आघाडीचे तीन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. या निवडणुकीत एमआयएम २ ,माकप १ यासह एका आमदार हे तटस्थ आहे.
महायुतीचे हे उमेदवार
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेत तिकीट न दिलेल्या भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे हे उमेदवार
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील तर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.