नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सागाची झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी देण्यासाठी तीन हजाराची लाच घेणा-या धुळे वनविभागाचे लेखापाल किरण गरीबदास अहिरे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना सागाची झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी मिळणे करिता वनक्षेत्र पाल , धुळे कार्यालयाकडे अर्ज केला होता. सदर परवानगी मिळणे करता तक्रारदार हे उपवनसंरक्षक कार्यालय धुळे येथे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. तेव्हा नमूद कार्यालयातील लेखापाल यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याने ला.प्र. वि. कार्यालय येथे तक्रार केली होती. त्यानंतर ११ जुलै रोजी तीन हजार रुपये पंचांसमक्ष स्वतः स्विकारतांना ते एसीबीच्या जाळ्यत अडकले.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष , 40 वर्ष, जिल्हा- जळगाव
आलोसे – किरण गरीबदास अहिरे, वय – 43 वर्ष, लेखापाल उपवन संरक्षण कार्यालय धुळे वनविभाग धुळे ( वर्ग 3) , राहणार – प्लॉट नंबर 19, संत कबीर नगर, देवपूर, धुळे.
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- दि. 11.07.2024 रोजी 3,000/-रुपये .
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक- दि. 11.07.2024 रोजी 3,000/- रू
*लाचेचे कारण – यातील नमूद तक्रारदार यांना सागाची झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी मिळणे करिता वनक्षेत्र पाल , धुळे कार्यालयाकडे अर्ज केला होता. सदर परवानगी मिळणे करता तक्रारदार हे उपवनसंरक्षक कार्यालय धुळे येथे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. तेव्हा नमूद कार्यालयातील आलोसे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी केल्याने ला.प्र. वि. कार्यालय येथे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज रोजी दि. 11.07.2024 रोजी पडताळणी केली असता, आलोसे यांनी 3,000/- लाचेची मागणी करून लाचेची रक्कम 3,000/- रुपये पंचांसमक्ष स्वतः स्विकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा. वनसंरक्षक, प्रादेशिक, धुळे.
परिवेक्षण अधिकारी-
श्री. सचिन साळुंखे
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.विभाग, धुळे.
मो.न.9403747157, 9834202955*
सापळा अधिकारी-
रूपाली खांडवी,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र. विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.