येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १७ जून रोजी येवल्यातील मातंग समाजातील तरुण प्रसाद खैरनार याला येवल्यात मारहाण झाली होती तसेच मारहाण करताना अर्धनग्न अवस्थेत त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गृह विभागाने घेतली. यानंतर येवल्यामध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात ॲट्रॉसिटीचां गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणांमध्ये सहा आरोपींना अटक झाली नसल्यामुळे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जन्म मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक धुळे जळगाव या ठिकाणाहून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते सदर समोरच्या विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला. मोर्चाचा समारोप येवला तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले. सदरचा मोर्चा दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता.