नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीच्या धडकेत ६५ वर्षीय अनोळखी महिला ठार झाली. हा अपघात त्र्यंबकरोडवरील जिल्हा रूग्णालया समोर झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक हेमराज गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. सदर महिला जलतरण तलावाकडून ठक्कर बाजारच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना जिल्हा रूग्णालयात समोर तिला भरधाव दुचाकीने धडक दिली होती.
या घटनेत तिच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाल्याने परिसरातील नागरीकांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. तर अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक गांवडे करीत आहेत.