मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या नवीन ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्सना पोज देते, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलला सामोरे जावे लागते. आता तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये उर्फीला रेस्टॅारंटबाहेरून दोन महिला पोलिस घेऊन जातांना दिसत आहे. अगोदर या पोलिसांशी वाद झाल्यानंतर ती या महिला पोलिसांबरोबर पोलिस व्हॅनमध्ये बसते. असा हा व्हिडिओ आहे.
याअगोदर मॉडेल उर्फी जावेद ही सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे अभिनेत्रीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद हिने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. तिथे तिनी रुपाली चाकणकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी गेलेल्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
आता पुन्हा उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता दाखवल्याचा आरोप करत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण, काय कारवाई केली हे मात्र पुढे आले नाही.
Model Urfi Javed Mumbai Police Enquiry Today