इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः दोन लाखाची लाच घेतांना महावितरणचे विद्युत कार्यकारी अभियंता धनाजी रघुनाथ रामुगडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदारांनी केलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी रामगुडे व दिवेकर यांनी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील दीड लाख रुपये अगोदर घेतले आहेत. दोन लाख रुपयांपैकी तडजोड करून एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले; मात्र तक्रारदारांनी लाचलुचपतकडे तक्रार केल्याने सापळा रचण्यात आला. कन्नड विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात लाचेची रक्कम रामुगडे व दिवेकर यांनी स्वीकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.