नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिस्तूल बाळगणा-आ २५ वर्षीय तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्यासह एक जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने केली.
किरण सुकलाल केवर (२५ रा.रामवैभव अपा.हनुमानवाडी मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. गंगापूररोडवरील प्रमोद महाजन गार्डन भागात उभ्या असलेल्या तरूणाजवळ अग्निशस्त्र असल्याची माहिती युनिटचे हवालदार मनोहर शिंदे व अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास धाव घेत ही कारवाई केली.
संशयिताच्या अंगझडतीत गावठी कट्यासह एक जीवंत काडतुसे आढळून आले असून त्यास मुद्देमालासह सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विवेकानंद पाठक,हवालदार मनोहर शिंदे,अंमलदार विशाल कुवर,समाधान वाजे,स्वप्निल जुंद्रे,महेश खांडबहाले,तेजस मते,प्रकाश महाजन व वाल्मिक चव्हाण आदींच्या पथकाने केली.