नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना अटक केली आहे. तेलंगणाच्या दामेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जून रोजी १९० किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे.
तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणात बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. तपासा दरम्यान लक्ष्मी ताठेंचे नाव पुढे आल्याने १ महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाने लक्ष्मी ताठेंची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि त्यांचा काहीही संबध नाही असे सांगण्यात आले आहे. २०१८ मध्ये सुध्दा ओडिसामधील गांजा तस्करी प्रकरणात त्यांना मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतले होते. त्यावेळेस त्या महिनाभर फरार होत्या.