यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित
पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचा आणि सहज उपलब्ध असलेला घटक. शास्त्रीय दृष्ट्या पाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेतच. आज आपण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे बघणार आहोत.
पाण्याला मेमरी असते, त्याला सर्व समजते असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही. सुप्रसिद्ध जपानी संशोधक Emoto यांनी काही प्रयोग केले. सहा वेगवेगळ्या crystal clear bottles मध्ये पाणी ठेवले, त्यातील प्रत्येक bottle जवळ वेगवेगळ्या emotions चे वाक्य सतत म्हणले आणि काही काळानंतर त्यातील प्रत्येक bottles मधील घेतलेल्या images थक्क करणाऱ्या होत्या. जेथे त्यांनी सकारात्मक आणि चांगल्या भावना बोलल्या होत्या तेथे अतिशय सुरेख अशी डिझाईन्स तयार झालेली होती. जेथे negative आणि वाईट गोष्टी बोलल्या होत्या तेथील images न बघवणाऱ्या होत्या. (Google वर images available आहेत)
असो. याचा आपल्याला उपयोग काय? आहे तर!! आपले शरीर ही पंच महाभुतांनी बनलेले आहे. सर्वात मोठा घटक पाणी आहे हे सांगायला नकोच. मेंदूचा ही मोठा घटक पाणीच आहे. मग, आपण सतत करत असलेल्या विचारांचा त्या पाण्यावर तसाच परिणाम होत असणार. त्यामुळे सतत चांगले, सकारात्मक विचार करणे हे किती महत्त्वाचे आहे हे समजले असेलच.
एखादा रोगी असेल तर आम्ही रामरक्षा किंवा तत्सम स्तोत्र त्याच्या नातेवाईकांना म्हणायला सांगतो. याबरोबरच, स्वच्छ पाण्याचा ग्लास घेऊन त्यावर हात ठेवून स्तोत्र म्हणले आणि ते पाणी रोग्याला प्यायला दिले तर त्याचा दुहेरी फायदा त्याला मिळतो.
घरात जेथे पाणी साठवून ठेवतो ती जागा, तो कोपरा स्वच्छ असावा, त्याजवळ सकाळ संध्याकाळ एक छोटे निरांजन लावून बघा. जरूर करून बघा. घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा तयार होते. भांडणे कमी होतात. ते पाणी पिणारे निरोगी राहतात. घरात येणाऱ्या लक्ष्मी मध्येही उत्तम वाढ होते.
अजून एक प्रयोग आहे, परंतु त्यासाठी शांत, सकारात्मक मन हवे. (If you have logical mind and it keeps on popping up, please ignore) दिवसभरात कधीही जेव्हा मन शांत, सकारात्मक असेल तेव्हा हातात ग्लासभर पाणी घ्या, दोन्ही हातात gratitude ची भावना ठेवून त्या पाण्याला तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि शांतपणे ते पाणी प्या. ती इच्छा पूर्ण होतेच होते. हवं तर एखादी छोटीशी इच्छा मागून बघा.
आज सांगितलेले सर्व उपाय नक्की करून पहा. खूप छान, सकारात्मक ऊर्जा तुमच्या वास्तूत नांदायला लागेल. सकारात्मक स्पंदन युक्त वास्तू, शरीर आणि मन असेल तर तुम्हाला काहीही अप्राप्य नाही हे लक्षात ठेवा.
यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित, पुणे