माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१-पावसासाठी सध्याच्या मुख्य प्रणाल्या अजूनही अनुकूलतेत कायमच आहेत. पुढील ४ दिवस म्हणजे शनिवार १३ जुलै पर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
२-रविवार १४ जुलै पासून त्यापुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार १८ जुलै पर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.
३- १५ जुलै पर्यन्त बक्कळ ओलीवर अजूनही खरीपाच्या चांगल्या पेरण्या होऊ शकतात, बाठर ओलीवर केलेल्या अति- आगाप पेरण्यां केवळ एमजेओच्या प्रणालीतून झालेल्या किरकोळ पावसामुळे कशा-बशा जरी सध्या तग धरून उभ्या असल्या तरी तो निर्णय अति-घाईचाच होता, असेही आज वाटते. त्यावेळी पेरणीसंबंधी केलेले आवाहन खरे ठरु पाहत आहे. असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune