नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे, मुंबई नंतर आता नाशिकमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर रानवारा हॉटेल जवळ अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सौ. अर्चना किशोर शिंदे (३१) रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक असे मृत महिलेचे नाव आहे. पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यानंतर वाहन चालक त्याठिकाणी न थांबता पळून गेला. पण, पोलिसांनी या वाहनचालाकाच शोध घेऊन त्याला गजाआड केले.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल, बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर सौ. अर्चना किशोर शिंदे वय ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक या पायी जात असतांना पाठीमागुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. सदरील वाहनावरील वाहन चालक त्याठिकाणी न थांबता पळून गेला. त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे तसेच पोलीस स्टाफ असे तात्काळ पोहचले व जखमी महिलेस उपचारार्थ सिव्हील हॉस्पीटल, नाशिक येथे दाखल केले. पण, शिंदे या मयत झाल्याचे वैदयकीय अधिकारी यांनी घोषीत केले.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पळून गेलेल्या वाहनाची माहिती घेतली असता तेथे काही जणांनी वाहनाचा क्रमांक एमएच- ०३-बीई-६६३४ हा असल्याचे सांगितले. तेव्हा गंगापूर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी या वाहनाची माहिती काढून सदर वाहन देवचंद रामु तिदमे रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, नाशिक यांचे मालकीची असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या पत्यावर जाऊन देवचंद तिदमे याचा शोध घेतला असता तो त्याठिकाणी राहत नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुन्हा माहिती घेतल्यानंतर तिदमे हे कृष्णा रेसीडेन्सी, फलॅट नं.४, ध्रुवनगर, नाशिक येथे राहत असल्याचे समजुन आले. तेव्हा लागलीच त्याचे नमुद पत्यावर जाऊन त्यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी तिदमे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तो मदयाच्या सेवनाखाली असल्याचे दिसून येत असल्याने सांगितले. त्यानंतर त्याची वैदयकीय अधिकारी सिव्हील हॉस्पीटल, नाशिक यांचेकडून वैदयकीय तपासणी करुन त्याचे रक्ताचे सॅम्पल फॉरेन्सिक तपासणीकरिता घेण्यात आले आहे. आरोपी देवचंद रामु तिदमे वय-५१ वर्षे रा. फलॅट नं.४, कृष्णा रेसीडेन्सी,, ध्रुवनगर, गंगापुर शिवार, नाशिक यांस या गुन्हयात अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. सोमनाथ गॅजे हे करित आहेत. गंगापुर पोलीस स्टेशन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतपुर येथे वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सरफुदीन सैनऊदीन अन्सारी (२२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.