इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देताना शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका गेल्याचे चित्र लक्षवेधी ठरले आहे. तर मोडकवाडी जिंती येथील अंगणवाडी सेविकेने सुध्दा असे अर्ज बांधावर जाऊन भरले आहे.
एकीकडे शहरी भागात या योजनेसाठी ठिकठिकाणी गर्दी व गोंधळ सुरु असतांना ग्रामीण भागात मात्र थेट घरी जाऊन, बांधावर जाऊन अर्ज भरले जात आहे. या योजनेविषयी अजूनही स्पष्ट माहिती महिलांना मिळत नसल्यामुळे गोंधळ आहे. त्यात ऑनलाईनमध्ये अर्ज भरतांनाही अनेक अडचणींना सामना महिलांना करावा लागत आहे. त्यामुळे साता-यातील चित्र हे कौतुकास्पद ठरले आहे.