इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात आता दारु पिऊन वाहन चालवल्यास त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाणार आहे. अगोदर खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. आता दारु पिऊन आढळल्यास पहिल्यांदा त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल. त्याच व्यक्तींने जर पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार आहे. मात्र तिस-या वेळेस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द केले जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
पुण्यात गेल्या महिन्यात १६४८ जणांवर ड्रंक अॅण्ड ड्रायव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोर्से कार प्रकरणात हा विषय़ावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. आता यातून दारु पिऊन वाहन चालवण्याचे प्रमाण किती कमी होते. हे काही दिवसात समोर येईल.
दरम्यान पुण्यातच नाही तर इतर मुंबईतही वरळीत दारु पिऊन वाहन चालवल्यामुळे घटना घडली. त्यामुळे सरकारही आता अॅक्शन मोडवर आहे.