नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस स्टेशन आवारातच एका विवाहीत महिलेने आपली हाताची नस कापल्याची धक्कादायक घटना घडली. सातपुर पोलिस स्टेशनच्या आवारात या महिलेने प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या ठिकाणी या महिलेचे बाजूला आपण आत्महत्या करण्याच्या कारणाची चिठ्ठी देखील या ठिकाणी सापडली आहे
मात्र सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलेने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सातपूर पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे सातपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सदर महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने रिक्षा बोलवत तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे
या घटनेमुळे पोलिस स्टेशन आवारात चांगलीच खळबळ निर्माण झाली.