यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित
साडेसाती चालू आहे, शनी महादशा चालू आहे, शनी पीडा चालू आहे म्हणून कधीही नीलम धारण करू नये. अनेक लोक मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालतात. लोखंडी वस्तूंवर शनीचा अंमल असतो. मधले बोट ही शनीचे असते. त्यात कुठलीच अंगठी परिधान करू नये.
तसेच शनी मंत्र म्हणणे, घरात लावणे, राहू सारख्या ग्रहाचे जप करणे म्हणजे आपल्या कुंडलीतील त्यांचा प्रभाव वाढवणे होय. साडेसाती मध्ये, शनी महादशे मध्ये already त्यांचा प्रभाव कुंडलीत असतोच! तसेच हे पाप ग्रह असल्याने त्यांचा प्रभाव वाढवून देखील ते अपायच करतात. शनीचे काम विलंबाने फळे देणे असे असते. त्याचा प्रभाव वाढवून विलंबात वाढच करत असता तुम्ही!
शनीच्या प्रभाव असलेल्या काळात वरील गोष्टी करत असाल तर ताबडतोब थांबवणे इष्ट ठरेल. घाबरायचे कारण नाही मुळीच. त्या केल्याने तुमचे रक्षण वगेरे ते करतात असे मुळीच नाही. नीलम तर गृहस्थाश्रमींनी अजिबात घालू नये.
साडेसाती ही घाबरायची गोष्ट नाही तर त्यात लाँग टर्म benefits मिळत असतात. आत्मिक उन्नती होत असते. ती संपताच पुन्हा उत्तम गोष्टी घडायला लागतात.
यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडीत, पुणे
मो – 9850837356