नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढी पंढरपुर यात्रा आषाढ शु. सप्तमी १३.०७.२०२४ ते २२.०७.२०२४ या कालावधीत भरणार असून यात्रेचा मुख्य दिवस दिनांक १७.०४.२०२४ आषाढी शुध्द एकादशी हा आहे. तसेच गुरुपौर्णिमा दिनांक २१.०७.२०२४ रोजी आहे, आगाराच्या कक्षेत पंढरपुर येथे जाणारे व येणारे यात्रेकरूंची वाहतुक दिनांक १३.०७.२०२४ ते २२.०७.२०२४ पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच सदर जादा वाहतुकीसाठी नाशिक विभागा मार्फत ३०० बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. पंढरपूर येथे जाणा-या भाविक प्रवाशांकरीता खालील केंद्रावरुन जादा रा.प. बसेस पंढरपुर येथे पाठविण्यात येणार आहेत, त्या बस स्थानकांची नाव पुढील प्रमाणे आहेत.