नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –मराठा आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. दोन्ही नेते एकमेकांवर रोज शाब्दिक वार करतात. त्यामुळे हा वाद चिघळतच असतो. आता पुन्हा जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेत भुजबळांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, छगन भुजबळ यांचा मुका घ्या, कडेवर बसवा, आम्हाला काही घेणे देणे नाही. मराठा आरक्षणाचे ते खरे मारेकरी आहेत. त्यांना थांबवा बळ देऊन जर मराठा समाजा विरोधात षडयंत्र रचत असाल तर आम्ही ठरवू विधानसभेच्या २८८ जागा कशा पाडायच्या. असा इशारा त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.
सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडमध्ये मराठा जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांना हा इशारा दिला.
जरांगे पुढे म्हणाले की, समाजातील ५४ लाख मराठयांच्या नोंदी सापडल्या आहेत. ही नोंद रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ करत आहेत. त्या या मागणीला सरकारचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. अंतरावली सराटी येथे शांततेत आंदोलन सुरु असताना त्याच्या बाजुला ओबीसीचं आंदोलन बसवलं. मराठ्यांशी दंगल घडवण्यासाठी मोठे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला. छगन भुजबळ यांना बळ देऊ नये अशी विनंती देखील जरांगे यांनी आपल्या भाषणा दरम्यान केली. छगन भुजबळ सारखे नेते मराठा समाजा विरोधात बोलत आहेत. मराठ्यांना नेरिटि्ह पसरवत आहे. मात्र याचा रोष फडणवीस यांच्याकडे जात आहे. नेरिटिव्ह भरवण्याच्या नादात राज्यात भाजप संपत आहे अशी टीकाही त्यांनी केली.