नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रात्रीचे जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना जेलरोड परिसरातील ढिकलेनगर भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लताबाई देवराम हिंडे (रा.श्रीरामनगर,कॅनलरोड जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिंडे या शनिवारी (दि.६) रात्री जेवण आटोपून नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली.
ढिकलेनगर कडून त्या राजराजेश्वरी चौकाच्या दिशेने त्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यानी त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रूपये किमतीची पोत बळजबरीने हिसकावून नेली. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.