नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भंगार गोडावून मध्ये राजरोसपणे सुरू असलेला कत्तलखाना पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत चार गोवंश जनावरांची सुटका करीत पथकाने या ठिकाणाहून ८७० किलो मास व कत्तलीसाठी वापरण्यात आलेली धारदार शस्त्र हस्तगत केली आहे. पोलीसांची चाहूल लागताच कसाई पसार झाले असून याप्रकरणी गोडावून मालकासह तीन जणांविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हाजी राशीद अली (रा.सादिक नगर मागे.वडाळागाव) व त्याचे तीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अंमलदार सागर परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. भंगार व्यावसायीक हाजी अली याच्या गोडावून मध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार शनिवारी (दि.६) मध्यरात्री पथकाने छापा टाकला असता राजरोसपणे कत्तलखाना सुरू होता. या ठिकाणाहून ४८ हजार रूपये किमतीचया दोन गाई व दोन जीवंत गोºह्याची सुटका करण्यात आली असून या कारवाईत गोवंश जातीच्या जनावराचे सुमारे सात हजार रूपये किमतीचे ८७० किलो मांस पोलीसांच्या हाती लागले आहे. अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.