नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी अधिकृत दौऱ्यासाठी मॉस्को येथे आगमन झाले. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर वनुकोवो-2 विमानतळावर रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान माननीय डेनिस मँतुरोव्ह यांनी त्यांचे औपचारिकरित्या स्वागत केले.
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील. त्याचबरोबर मॉस्कोमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील ते संवाद साधतील.