रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

by Gautam Sancheti
जुलै 9, 2024 | 12:05 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
WhatsAppImage2024 07 08at8.55.39PMHK2Z

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुण्यातील लोकनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय मंत्री म्हणून आज दिवसभर आयोजित मॅरेथॉन बैठकांमध्ये मी पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये पुणे महानगरपालिका, पीएमपीएमएल, पुणे मेट्रो, पुणे विमानतळ तसेच पुणे रेल्वे विभाग यांच्याशी संबंधित विविध कामांची माहिती घेण्यात आली. वरील सर्व विभागांमधील प्रगतीपथावरील सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलसंदर्भात बोलताना ते म्हणाले की नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु झाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली असल्याने नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या 14 जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे’

ते पुढे म्हणाले, आपल्या पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे, हा आपला प्राधान्याचा विषय असून या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि विविध विभाग प्रमुखांशी चर्चा केली. पुणे शहरात मेट्रो मार्गांचा विस्तार होत असला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक बसेसची संख्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने एकूण 777 नवीन बसेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

शहराचे पर्यावरण व सार्वजनिक वाहतूक यांचा समतोल साधण्यासाठी डिझेल बसेसचे रूपांतर CNG बसेसमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 226 डिझेल बसेस आता CNG बसेसमध्ये लवकरच रूपांतरित करण्यात येणार आहेत, तशी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.

पुणे मेट्रोच्या सद्यस्थिती आणि भविष्यातील योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते झाले. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून मेट्रोच्या रुपाने पुणेकरांसाठी सक्षम वाहतूक व्यवस्था तयार होत आहे, हे स्पष्ट आहे. शहरातील काही भागात मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यात स्वारगेट ते कात्रजदरम्याचा भूमिगत मार्गही असून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्वरीत त्याचे काम सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक, एसएऩडीटी ते माणिकबाग, हडपसर-लोणीकाळभोर या मार्गांबद्दलही विचार सुरू आहे. याला मान्यता मिळाल्यावर त्याचे काम सुरू होईल.

यावेळी पुणे विमानतळावरील टर्मिनलपर्यंत मेट्रो नेणे आणि चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गाबद्दल सर्व मुद्द्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे पुणे मेट्रो आणि फिडर बससेवेद्वारे अधिकाधिक नागरीकांना फायदा होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंच मेट्रो कनेक्टीव्हिटी देण्यावर आपण भर दिला पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

यासोबतच, पुणे महानगरपालिकेशी संबंधित रस्ते, उड्डाणपुल, नदीसुधार प्रकल्प, 24X7 पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर रखडलेले प्रकल्प यांच्याबाबतही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी आढावा घेतला. वरील सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करून नागरिकांचे जीवन सुखकर करावे, अशी सूचनाही मुरलीधर मोहोळ यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरपंच पती, सासरा, उपसरपंच, ग्रामसेवक ३० हजाराच्या लाच प्रकरणात अडकले….

Next Post

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मॉस्कोत…असे झाले स्वागत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
GR9ypuYXIAA tHZ

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मॉस्कोत…असे झाले स्वागत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011