येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील प्रसाद खैरनार या तरुणाला काही लोकांनी घरी नेऊन अर्धनग्न करत जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची मातंग समाज संघटनेने येवला शहर पोलिसात जाऊन तक्रार अर्ज दाखल केला असून फरार झालेल्या आरोपींना तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा दलित संघटना तर्फे उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेनंतर दीपक केदार यांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व पोस्ट टाकली आहे.