इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईच्या पावसामुळे थांबलेल्या रेल्वेमुळे आज महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अनेक आमदारांना रुळावरुन चालावे लागले. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यानंतर आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यावरुन सरकारला धारेवर धरत चिमटा काढला आहे.
त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ही छायाचित्रे पाहून तुम्हाला वाटेल की मंत्री अनिल पाटील हे पावसात ट्रेन आणि ट्रॅकची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पण तसं नसून ते स्वतःच पावसामुळे थांबलेल्या ट्रेनमध्ये अडकले आणि परिस्थिती अशी आहे की त्यांनाही रुळांवरून चालत पुढे जावं लागलं.
त्यांच्यासोबत एक आमदार अमोल मिटकरी दिसत आहेत, त्यांच्यासोबत आणखी १० आमदार रेल्वे मार्गावर अडकले आहेत. बहुतांश आमदार विधानभवनात पोहोचू न शकल्याने आज विधानभवनाचे अधिवेशन दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काही ट्रेनमध्ये तर काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. सरकारचे अपयश त्यांना महागात पडले आहे. हे त्यांचे मेगा भ्रष्टाचाराचे मॉडेल आहे. नाली साफसफाईचे काम नीट झाले नाही असे आम्ही सांगत राहिलो, पण त्यांना स्वतःची फुशारकी मारायला वेळ नाही. त्यांचीच ही अवस्था असेल तर सर्वसामान्य मुंबईकरांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा.