इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा आहे. विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. या निर्णयामुळे अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यात म्हटले की आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणालं त्यावर आम्ही अभ्यास करू.