इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू हिंसा पसरवतो असे सांगितल्या आरोप त्यांच्यावर भाजपने केला. त्यानंतर देशभर त्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन झाली. पण, आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी यांनी त्याबद्दल आपले स्पष्ट मत मांडले.
ते म्हणाले की, राहुल गांधींचे संपूर्ण भाषण आम्ही ऐकले. हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, असे ते स्पष्टपणे सांगत आहेत. राहुल गांधी कुठेही हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत. राहुल गांधींच्या वक्तव्याचा अर्धा भाग पसरवणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे.
शंकराचार्यांच्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसने जोरदार पलटवार सुरु केला आहे. शंकराचार्याचा हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे.