नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील के.के.वाघ महाविद्यालय परिसरात बांधकाम साईटवरील पाचव्या माळयावर काम करीत असतांना पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार (रा.मध्यप्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. राजकुमार रविवारी (दि.७) दुपारच्या सुमारास मिरा दातार मंदिर परिसरातील बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. पाचव्या मजल्यावर काम करीत असतांना तोल जावून तो जमिनीवर कोसळला होता.
या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने समाधान खराटे यांनी त्यास तातडीने अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. प्रविण जाधव यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.