परदेशातील लहान मुलांमध्ये मराठी भाषा रुजवण्यासाठी उत्तमोत्तम बाल साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेअंतर्गत बाल विभागाच्या ग्रंथ पेट्या उपयुक्त ठरत आहेत. श्रुती हिंगे या नार्वे येथील ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होऊन वाचनाचा आनंद घेत असतांनाच तेथील लहान मुलांना मराठी भाषा सुध्दा अवगत व्हावी म्हणून त्यांच्या पुढाकाराने यूरोपातील नॉर्वे येथे ग्रंथ तुमच्या दारी – बाल विभाग सुरू होतो आहे, त्यांनी आनंदाने नॉर्वे येथील बालविभागाच्या समन्वयक म्हणून जबादारी स्वीकारली आहे
कुसुमाग्रज स्मारक येथे श्रुती हिंगे यांना नॉर्वे येथे नेण्यासाठी अशोका ग्रुपचे संचालक श्री संजय लोंढे यांनी पुरस्कृत केलेल्या बाल साहित्याच्या ग्रंथ पेट्या विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. नॉर्वे येथे अमरेंद्र उकडवे यांच्या पुढाकाराने मोठ्या वाचकांच्या ग्रंथ पेट्या गेल्या दोन वर्षांपासून उपलब्ध होत आहेत.
१५ वर्षांपासून सतत जगभरात विस्तारत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या ग्रंथ तुमच्या दारी या वाचकप्रिय योजनेद्वारे भारत आणि भारताबाहेर १८ देशात एकूण साडे तीन कोटी रुपयांची मराठी ग्रंथ संपदा वाचनासाठी उपलब्ध झाली आहे.