इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई येथे गर्दीमुळे एका महिला रेल्वे ट्रॅकवर पडली आणि रेल्वेचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला. या दुर्दैवी घटनेत महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
आज सकाळी १० च्या सुमारास बेलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन पकडण्यासाठी गेली. मात्र बेलापूर ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तिचा पाय घसरला आणि लोकलखाली पडली. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली आणि तिच्या अंगावरून गेली आणि तिचे दोन्ही पाय कापले गेले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि काही वेळातच गाडी हटवून त्या महिलेचे प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत. त्या महिलेवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाल्यामुळे लोकल पकडण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यात ही दुर्घटना घडली.