लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सीमा शुल्क विभागाचा चालक ठार झाला तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्याची तयारी करण्यात आली. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करण्यात आला. पण, हा पाठलाग करतांना सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले तर लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे…