इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वरळीतील भल्या पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी शिंदे गटातील उपनेता राजेश शाह व ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत यांना अटक केली आहे. तर मिहिर शाह हा फरार आहे. त्याला शोधण्याासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना झाली आहे. या घटनेत राजेश शाह यांनी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचे म्हटले. पण, अपघात झालेल्या दाम्पत्यामधील पतीने फरार असलेला मिहिर शाह हाच गाडी चालवत असल्याचे म्हटले.
पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले. ही कार शिंदे सेनेच्या उपनेता राजेश शहा यांची असून ती मुलगा मिहिर शाहा चालवत होता.
दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिल्यानंतर महिलेला फरफटत नेण्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दुचाकीला कारची मागून धडक बसली. त्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन कारसह फरार झाले होते. मुलगा आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिहीर शाह कार चालवत होता. मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार या चाकीने फरफटत नेले. वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडली.
या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत असून मिहिर शाह यांची गर्डफ्रेंडची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.